अहमदाबाद : गुजरात एटीएसला मोठं यश मिळालेे आहे. एटीएसने 3 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मागील 1 वर्षापासून ते गुजरात एटीएसच्या रडारवर होते. या तिघांना शस्त्र पुरवठा करताना अटक करण्यात आली आहे. हे संशयित दहशतवादी देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते. मात्र एटीएसने केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा हा कट उधळला आहे.
गुजरात एटीएसने अटक केलेले तिन्ही संशयित मूळचे हैदराबादचे असल्याचे बोलले जाते. हे 3 संशयित दहशतवाद्यांच्या नव्या मॉड्यूलशी जोडले होते. गुजरातमध्ये अडालज येथे या तिघांना अटक करण्यात आली. ज्या तिघांना संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. ते मागील वर्षभरापासून गुजरात एटीएसच्या रडारवर होते. एका गुप्तहेराने माहिती दिल्यानंतर एटीएसने आज सकाळी या तिघांना अटक केली. हे तिघेही साठी काम करत होते. याबाबत गुजरात एटीएस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे.
युपीतून एका दहशतवाद्याला अटक
अलीकडेच उत्तर प्रदेश एटीएसने सहारनपूर येथून दहशतवादी बिलालला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. बिलाल पाकिस्तानमधील अल कायदाच्या हँडलर्ससह सुमारे 4,000 नंबरशी संपर्कात होता असे समोर आले आहे. पाकिस्तानी हँडलर्स त्याला दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्याबाबत सतत सूचना पाठवत होते. तो सोशल मीडियावर जिहादी प्रचार पसरवत होता. बिलाल हा अल-कायदाच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. त्याला 15 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.
4 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या रिमांड कालावधीत एटीएसने बिलालच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एटीएस सध्या बिलालच्या मोबाईल डेटाची पडताळणी करत आहे. बिलालने सरकार अस्थिर करण्यापासून शरिया कायदा लागू करण्याबद्दल बोलल्याचेही समोर आले आहे. ही अटक च्या भारतातील दहशतवादी नेटवर्कशी संबंधित मोहिमेचा भाग होती. अटकेनंतर ने त्याच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी केली, ज्यातून पाकिस्तानशी असलेले संपर्क समोर आले होते.